Friday, 17 October 2014

premal ..sandhyakal............

prem..........


कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही..निरक्षर 

वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भावनांचा खेळ तो शिकवता येत नाही यालाच प्रेम म्हणतात 

असं काही शास्त्र नाही.. प्रेमात पडल्यावर ही कां प्रेम करतो सांगता येत नाही.. कधी फक्त एका नजरेत प्रेम 

कळून जातं कधी कुणाच्या सहवासात प्रेम भेटून जातं.. प्रेम आयुष्यात आल्यावर जगणं मात्र बदलून जातं..

 सारं काही तेच असून ही वेगळ्या विश्वात घेऊन जातं.. सर्वस्व ओवाळून टाकावं इतकं कुणी आवडून जातं 

दोन आत्म्यांच मिलन प्रेम भेटता होऊन जातं.. ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव त्यालाच प्रेम कळून जातं.. 


बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे वेड्यांच जग होऊन जात.

Friday, 8 August 2014

maitri

जीवनाच्या प्रवासात मिळतात असे मित्र मैत्रिणी … जसा लक्ख प्रकाश आपल्याच अंगणी 

Saturday, 5 April 2014

मंतरलेले दिवस

कुठल्या क्षणात अडकले मन न कळे

आठवणींच्या लाटाचा उन्माद उसळला


तू बाजूने गेलास अनोळखी  सारखा


मलाच माहीत तो क्षण मी कसा सांभाळला.





Monday, 10 March 2014

आज ही तो मला मोठ्या आपुलकीने कॉल करतो,
. .
. .
आणि मी माझ्या खोट्या इगो साठी आज हि काल उचलत नाही


हेच नाते असते ……।


आपला इगो नात्या पेक्षा मोठा केव्हा होता काही कळलेच नाही

Sunday, 2 March 2014

मन किती वेडे !!!!!!!!!!!

आपले मन किती वेडे असते,

समुद्र किनारी फिरताना ,

लाटांशी खेळताना … पायाखालील वाळू वाहून जाते तरी हि आपण त्या वाळूच्या , लाटांच्या प्रवाहात स्वताला वाहून जाण्याची ओढ  जाणवते 


अजून  हि त्या ओल्या वाळूत , सागरी लाटांमध्ये खेळणे , मनाला  अविस्मरणीय अनुभव , आणि हा अनुभव प्रत्येक वेळी नवा आणि अजून हवाहवा असतो, 

आज हि त्या लाटा , वाळू खुणावतात  मला ……समुद्र च्या लाटांच्या किनारी उभे राहून लाटा हि ये -जा , अचानक एकमेकांना सामावून घेणे , खूप संथपणे आपल्याला स्वताच्या भाव विश्वात हरवून , रमवून परत आपल्या ला अस्तित्व्याची जाणीव करून  देते ,  

Sunday, 23 February 2014

शुभ प्रभात ……………


या जगात प्रत्येकाची काही न  काही समजूत असते च …………. आपले  वागणे …। बोलणे …. काम करण्याची पद्धत ,

काही वेळा तो स्वताला खूप शहाणा च समजतो , स्वत करेल तेच खरे , तेच बरोबर अस त्याला वाटते 

Saturday, 15 February 2014

अवकाळी पाऊस !!!!!!!!!!!!!!!!!

अवकाळी पाऊस ही येउन गेला ..
जुन्या आठवणींना भिजवून गेला ........

त्या मंतरलेल्या क्षणाना ..........

ओढ परत देऊन गेला ...............

Tuesday, 4 February 2014

!!!!! सहज सुचले मानून !!!!!!!!!


मनाचा अस्वस्थपणा माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही .



!!!!! सहज सुचले मानून !!!!!!!!!

शुभ संध्या …….



" सहवास हा काही क्षणाचाहि का असेना"  ...पण तो नेहमीच हवासा वाटतो.
जर ती व्यक्ती आपली जिवाभावाची - जिवलग असेल तर ,त्यांच्या सहवासात घालावंलेले , त्यांच्या सहवासातले ते काही क्षण हि मनाला उत्तुंग आनंद देऊन जातात खरच ............



Sunday, 2 February 2014

निसर्गासारखा नाही रे सोयरा ………. गुरु , सखा , बंधू , मायबाप ……. !

त्यांच्या कुशीत सारे व्याप ताप , मिटती क्षणात आपोआप !!











( माझे संकलन)

Monday, 20 January 2014

फक्त तुलाच पाहायला आवडत..................

आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...
माझ्या काही शब्दांन मोळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत...

अर्थ?????????????

कधी कधी जीवनाचा अर्थ समजणे खूपच अवघड असते ,

काय करावे, काय करू नये , काहीच समजत नाही ,
काही प्रश्नाची उत्तरे आपल्याला सापडतच  नाही, आणि काही उत्तरे सापडून हि न सापडलेली ,

आपल्या जीवनावर हसावे कि रडावे काही काळातच नाही,

आपली वागणूक चुकीची आहे कि बरोबर हे सुद्धा आपल्याला उमजत नाही,

समोरच्या व्यक्ती / परिस्थिती ही चुकीची नसते  न आपण ,


मग का , आपल्या मनात इतकी काहूर माजते ,कि आपले मन अशांत 

Sunday, 19 January 2014

life.............

जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते ………। 


हसण्याची इच्छा नसेल हि 
तरीही हसावेच लागते ……। 


कसे आहेत विचारले तर…… 
मजेत म्हणावेच लागते…………। 


जीवन एक रंगमंच आहे ……
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते ……………. 

Saturday, 4 January 2014

ओंजळ …………….

ओंजळ …………….



 सर्व काही तुला  देऊन
माझी ओंजळ भरलेली ………
पहिले तर तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली 

maitri

gooooooooooooood morning..................





ज्या माणसाशी आपण मैत्री करतो, त्याला अंश:त का होईना, समृध्द करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पहाव.